ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एस.एन.डी. टी. विद्यापीठ,मुंबई च्या बल्लारपूर आवारात कुलगुरूंचे आगमन

नॅक A+ मानांकनासाठी कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव यांचा सन्मान व शैक्षणिक प्रगतीचा आढावा

चांदा ब्लास्ट

एस.एन.डी. टी. विद्यापीठ,मुंबई चे बल्लारपूर केंद्र महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव यांचे आगमन झाले. या दोन दिवसीय दौऱ्यात त्या चंद्रपूर केंद्राच्या शैक्षणिक व प्रशासनिक कार्याचा आढावा घेऊन पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करतील.

एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई ला नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल (NAAC) कडून प्रतिष्ठेचे A+ श्रेणी मानांकन आणि 3.27 CGPA प्राप्त झाले आहे. तेव्हा A+ श्रेणी मानांकना विषयी सन्मान, बल्लारपूर येथून संचालित केंद्राच्या प्रगतीची माहिती व स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी माननीय कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव दोन दिवसीय दौऱ्यासाठी बल्लारपूरात आलेल्या आहेत.

१४ ऑगस्ट ला बल्लारपूर आवारात त्यांचा नेतृत्व सन्मान सोहळा व अभिनंदन सोहळा पार पडला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या शैक्षणिक प्रकल्पांची प्रदर्शनीचे उद्घाटन त्यांनी केले. यावेळी आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, विशेष अतिथी प्राचार्य अरुंधती कावडकर, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अल्मस्त उपस्थित होते. या मध्ये फूड टेक्नॉलॉजी,इंटिरिअर डिझाइन,फॅशन डिझाइन, बीसीए च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मा.कुलगुरूंनी प्रकल्पांचे कौतुक करत सर्व विभागांनी समन्वय साधून प्रकल्पाचे कार्य करावे असे नमूद केले.

 सन्मान व अभिनंदन सोहळ्याचे प्रास्ताविक बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ.राजेश इंगोले यांनी केले यामध्ये त्यांनी माननीय कुलगुरूंच्या स्त्री सक्षमीकरण, शैक्षणिक संबंधी कार्यावर,नेतृत्व क्षमतेवर व त्यांच्या मार्गदर्शनात भविष्यातील विविध प्रकल्प ज्यामध्ये AEDP,NEP चा समावेश आहे यांवर प्रकाश टाकला. सहायक कुलसचिव डॉ.बाळू राठोड यांनी आपल्या भाषणातून प्रशस्तिपत्राचे वाचन करत कुलगुरूंचे अभिनंदन केले, कार्यक्रमात कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव यांचा सत्कार व त्यांच्या हस्ते बल्लारपूर आवाराच्या प्रगती पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले.

मा.कुलगुरूंनी आपल्या मनोगतातून या यशासाठी संपूर्ण सहकारी व विशेषतः आवाराच्या उभारणीसाठी शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले. महर्षी कर्वेंची दूरदृष्टी, विचार यावर भाष्य करत उत्तम व्यक्तित्व कसे असावे यावर मार्गदर्शन केले.

 सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा.अश्विनी वाणी , आभार प्रदर्शन समन्वयक.डॉ. वेदानंद अलमस्त यांनी केले.या कार्यक्रमात प्रा.अरुंधती कावटकर यांच्या विशेष उपस्थिती सह सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये