ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती येथे ग्रामीण युवा उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त ग्रामीण युवा उद्योजकता प्रशिक्षण केंद्र, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोज बुधवारला ग्रामीण युवा उद्योजकता प्रशिक्षण बाजार समितीचे मुख्यालय भद्रावती येथे घेण्यात आले‌.

प्रत्येक जिल्ह्यात तालुका निहाय ग्रामीण युवकांना सुशिक्षित बेरोजगार शेतकरी एससी, एसटी, एनटी, ओबीसी यासारख्या इतर मागास घटकांना शेती विषयक निगडित व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य पालन, खेकडापालन या विषयाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती येथे कार्यशाळा राबविण्यात आली. कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक सौदागर सोनवले यांनी शेळीपालन ,पोल्ट्रीफार्म इत्यादी व्यवसायाची माहिती दिली. त्याप्रमाणे भद्रावती तालुक्यातील प्रशिक्षणार्थांनी हजेरी लावली व प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे संचालक श्री. ज्ञानेश्वर राजाराम डुकरे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच बाजार समितीचे सचिव श्री. नागेश पुनवटकर व बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर डुकरे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाजार समितीचे बांधकाम सभापती श्री. राजेंद्र डोंगे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये