ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉक्टर बालमुकुंद पालीवाल पर्यावरण गौरव पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबईचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          भारतीय पर्यावरण क्लब आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई द्वारा पर्यावरणाची क्षेत्रात दिला जाणारा या वर्षीचा पर्यावरण गौरव हा पुरस्कार चंद्रपूरचे वैद्यकीय क्षेत्रातील व पर्यावरण प्रेमी डॉक्टर बाल मुकुंद पालीवाल यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि विश्वेश्वर बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र मिराजे यांनी नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. याप्रसंगी पर्यावरण क्लबचे अध्यक्ष अमोघ घमांडे सचिव गणेश शिरोळे अध्यक्ष सचिन पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते.

 तसेच जमिनीपासून १८ हजार फूट उंचीच्या सियाचिन ग्लेशियर शिखरावर १० टन सिंगल न्यूज प्लास्टिक पासून घर बनविले. प्रोजेक्ट मॉडेल हाऊस यावर वातावरणाचा कोणताही वाईट परिणाम परिणाम होणार नसल्याचा त्यांनी दावा केला आहे.

तसेच त्यांनी नगरपरिषद बल्लारपूर येथे सिंगल युज प्लास्टिक पासून बैठकीचे आसन बनविण्याचा बहुमान मिळवला आहे.बॉटनिकल गार्डन विसापूर येथे नगर परिषद बल्लारशा यांच्या विद्यमानाने व माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली १३ टन सिंगल तुज प्लास्टिक पासून घर बनलेले तसेच त्याबद्दल पर्यावरण गौरव हा पुरस्कार डॉक्टर बालमुकुंद पालीवाल यांना मिळालेला आहे.

डॉक्टर पालीवाल यांच्या सोबत क्रिएशन करणारे संतोष जाधव हे नेहमीच त्यांच्यासोबत असतात. डॉक्टर पलिवाल यांना पर्यावरण गौरव हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे पूर्ण चंद्रपूर जिल्हाभरात अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये