राखीच्या धाग्यात गुंफले विश्वासाचे नाते : पोलिस स्टेशन भद्रावती येथे साजरा करण्यात आला रक्षाबंध कार्यक्रम
वंचित बहुजन महिला आघाडी भद्रावतीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वंचित बहुजन महिला आघाडी भद्रावती तर्फे रक्षाबंधनाचा स्नेहपूर्ण उपक्रम पोलिस स्टेशन भद्रावती येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून त्यांच्यावरील आपुलकी, विश्वास व संरक्षणाच्या नात्याचा सन्मान व्यक्त केला.
कार्यक्रमात सहायक पोलिस निरीक्षक विरेंद्र केदार यांच्यासह पोलिस खात्यातील अधिकारी व कर्मचारी निरंजने, सिडाम, भोयर, पुसांडे, शैलेश यांना राख्या बांधण्यात आल्या. महिलांनी राखी बांधतानाच त्यांचे कर्तव्यदक्षतेने समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा संध्या पेटकर, माजी नगरसेविका राखी रामटेके, सीमा ढेंगळे, लता टीपले, वैशाली चाहांदे, अनिता रायपुरे, सुनीता रामटेके, नंदा मस्के, आम्रपाली गावंडे, छाया सहारे, मनोरमा हस्तक, निर्मला शिरसाठ, शिल्पा घडले यांच्यासह अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी महिलांच्या या प्रेमळ उपक्रमाचे कौतुक केले व समाजाच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहण्याचा विश्वास दिला.