ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पाऊसाने नद्या – नाल्या तुडुंब भरून वाहतेय

नागभीड - उमरेड- नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. २५३ बंद

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पाऊसाने नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्याने नागभीड – उमरेड – नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. २५३ वाहतुकीसाठी बंद आहे.
मुसळधार पाऊसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात शनिवारी रात्री तथा रविवारी पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. वैनगंगा,  वर्धा, अंधारी, इरई, पैनगंगा तथा अन्य नद्याना पाणी आहे.
सर्वाधिक पाऊस हा सावली तालुक्यात १४३.५ मी.मी. तर नागभीड तालुक्यात १२३.६ मी.मी. झाला आहे. सततच्या पावसामुळे या तालुक्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्याने पहाटेपासुनच मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. नागभीड – उमरेड- नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. २५३ या मार्गावरील वाहतूक पहाटेपासून बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये