ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जागतिक आदिवासी दिनानिमित्त घुग्घुसमध्ये शीतपेय वाटप

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : शहरातील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनाखाली शीतपेयाचे वाटप करण्यात आले.
या दिवशी आदिवासी बांधवांतर्फे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी समाज बांधवांना सेवा केंद्रातर्फे शीतपेय वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव विनोद चौधरी, इर्शाद कुरेशी, तुलसीदास ढवस, धनराज पारखी, नितीन काळे, स्वप्नील इंगोले, असगर खान, हेमंत कुमार, गणेश राजुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.