जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घोडपेठ येथे महसूल सप्ताहाचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
तहसील कार्यालय भद्रावती येथील घोडपेठ मंडळामध्ये महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे घोडपेठ येथील शेतकरी भवनात सोमवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार राजेश भांडारकर, सरपंच अनिल खडके, नायब तहसीलदार सुधीर खांडरे, मनोज आकनूरवार, मंडळ अधिकारी जयश्री गणपुरवार, ग्राम महसूल अधिकारी विनोद चिकटे, दिनेश भिसिकर, अनिल गहुकर, गिरीश कोहळे, अनामिका भगत, अरविंद कोल्हटकर तसेच महसूल सेवक संदिप रामटेके,
प्रकाश दुपारे, वसीम शेख, रणजित डोंगे, घोडपेठ ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर नगराळे, प्राथमिक आरोग्य केंद्र घोडपेठचे डॉ. काकडे, कृषी पर्यवेक्षक मुक्ता ताजने, पोलिस पाटील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या शिबिरामध्ये विविध दाखले वाटप करण्यात आले, तसेच जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना सातबारा उतारे देण्यात आले. आरोग्य विभागाकडून विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. राशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, मतदार नोंदणी, शेतकरी ओळखपत्र व ई-पिक पाहणी यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. आधार नोंदणी व दुरुस्ती करिता सेतू सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय विविध बँकांच्या योजनांची माहिती देण्यात आली. दुय्यम निबंधक कार्यालयाकडून दस्त नोंदणी प्रक्रियेबाबत जागृती तर भूमी अभिलेख विभागाकडून सनद वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदिनी तामगाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार मनोज आकनूरवार यांनी केले. महसूल प्रशासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा व योजना उपलब्ध होऊन मोठा लाभ झाला