ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उप प्राचार्य प्रफुल्ल माहुरे, उप मुख्याध्यापक डाहुले, एम सी वी सी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे होत्या.

सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, प्रा. ठवरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन चरित्र वर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा बाळू उमरे यांनी केले.

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमान्य टिळक एक समाज सुधारक व क्रांतिकारक’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,या स्पर्धेत एकूण 32 विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रथम क्रमांक प्रसराम महारुद्र चावरे, द्वितीय क्रमांक कु.दिया संजय रहागंडाले, तृतीय क्रमांक कु. आरती माधव हाके, प्रोत्साहनपर कु रुबीदेवी विजेंद्र कैथल या विद्यार्थ्यांना मिळाला सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा सुधीर थिपे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये