ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सकल जैन समाज हा आर्थिक सक्षम असल्याचा केंद्र व राज्य सरकारचा भ्रम _ ललित गांधी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देशातील महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे की त्यांनी अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या विनंतीला मान देऊन 4 ऑक्टोबर 24 रोजी राज्यातील सकल जैन समाजासाठी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून जैन समाजासाठी संपूर्ण अधिकार व निधीसह महामंडळ स्थापन केले या महामंडळाचे अध्यक्षपदी ललित गांधी यांची नियुक्ती केली, देशात व राज्यातील सकल जैन समाजापैकी 30 टक्के समाज हा अजूनही अल्पभूधारक असून अनेक भागात मजुरी करून उदरनिर्वाह करीत आहे तर केंद्र व राज्य सरकारला असा भ्रम आहे की सर्व सकल जैन समाज हा आर्थिक सक्षम आहे हा त्यांचा भ्रम असल्याचे मत महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिनांक 30 जुलै रोजी त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्यानिमित्त धावत्या भेटीत देऊळगाव राजा येथे उपस्थित सकल जैन समाज बांधवा ंना सांगून सकल जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ काम करणार असून केंद्र व राज्य सरकारच्या जैन समाजासाठी ज्या ज्या योजना आहे त्या शेवटच्या जैन समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम सर्वांनी करण्याचे आवाहन केले.

  याबाबत सविस्तर असे की राज्यात जैन समाजासाठी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची 4 ऑक्टोबर 24 रोजी स्थापना झाल्यानंतर या मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यातील सकल जैन समाजाच्या सर्वांगीण समस्यांचा सखोल अभ्यास केला अनेक समाज बांधवांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामूळे समाजामध्ये हुशार विद्यार्थी असून केवळ व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याने वंचित आहेत. नवीन व्यापार सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य वेळेवर उपलब्ध होत नाही यासाठी सकल जैन समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी सर्व समाज बांधवांसोबत आमने-सामने संवाद साधण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजन केले एका जिल्ह्याचे मुख्यालयी संपूर्ण दिवसभर प्रशासकीय कामकाजाचा आढावा समाजा सोबत संवाद साधून ज्या ज्या योजना आहेत त्याची सखोल माहिती देण्याचे काम सुरू केले. देऊळगाव राजा येथे त्यांनी धावत्या भेटीत समाज बांधवांना सांगितले की,

जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे उद्देश व प्रमुख कार्य काय आहेत राज्यातील जैन समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे व त्यांचे सामाजिक सक्षमीकरण करणे जैन समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याजदराने स्वयंरोजगाराकरता कर्ज उपलब्ध करून देणे जैन समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पत साधने साधनसामग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकी साधने पुरवणे जैन समाजासाठी आवश्यक साहित्य आणि सामग्री यांची निर्मिती जुळवणी व पुरवठयासाठी आवश्यक वाटतील अशी सेवा देणे समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे व योजना साठी अहवाल तयार करणे अति प्राचीन जैन तीर्थांचे संरक्षण व संवर्धन करने

कायम पाई विहार करणाऱ्या जैन साधुसंतांच्या विहारासाठी सुरक्षा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या जैन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज व्यवस्था जैन समाजाच्या विधवा व परितक्त्या महिलांसाठी विशेष योजनांचा सहभाग असल्याची त्यांनी सांगितले यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने त्यांचा यथोचीत सन्मान करण्यात आला.

यावेळी त्यांच्यासोबत ऋषिकेश कोंडेकर व सकल जैन समाज बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये