सेवाभावी लोकभावनेचा गजर लोकनेत्याला सेवा उपक्रमांच्या शुभेच्छा!

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- ज्याच्या राजकारणाचा पायाच नर नारायण सेवे ने बनलेला आहे अशा लोकनेत्याला लोकांनी उस्फूर्तपणे विविध सेवा उपक्रमांनी शुभेच्छा दिल्या. माजी पालकमंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने बुधवारी एकाच दिवशी अनेक सेवाभावी कार्यक्रमांनी शहरात सेवाभावी लोकभावनेचा गजर झाला.
आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे हे आयोजन करण्यात आले. मित्र परिवाराचे संयोजक राहुल पावडे यांनी सम्पूर्ण शहराचा आढावा घेत सुधीरभाऊंच्या समर्थक आणि चाहत्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आ.मुनगंटीवार यांच्या वाढ दिवसानिमीत्य महानगरात भव्य रोग निदान,भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी आयोजित लोकोपयोगी कार्यक्रमात रुग्णांना फळ वाटप, वृक्षारोपण(64 स्थळी),गरीब विद्यार्थ्यांकरिता शालेय साहित्य वाटप(59 ठिकाणी),हनुमान मंदिर सुंदरकांड (2 स्थळी),मोफत पतंजलि योग प्रशिक्षण शिबिर (8 स्थळी),गरजवंतांना ब्लॅन्केट वाटप, ताडपत्री वाटप, वृक्षदिंडी, निबंध स्पर्धा,विविध दर्गाह मध्ये चादर पोशाई व लाडु वाटप,योग नृत्य परिवारां तर्फे प्रशिक्षण, विविध ठिकाणी भोजनदान, रेनकोट वाटप, विविध मंदिरात महाआरती(५१ स्थळी), डेबू सावली वृध्दाश्रमात भोजनदान, दिव्यांग संस्थेतील दिव्यांगाना भोजनदान, विविध बुध्द विहारात वंदना व साहित्य वाटप, विविध खेळातील उत्कृष्ट क्रिडापटूचा सत्कार, प्रशासकीय सेवेत उत्तम कार्य करणाऱ्यां उत्तम अधिकाऱ्यांचा सत्कार, आशा वर्कर व अंगणवाडी सेविकाचा सत्कार आदि कार्यक्रमाचा समावेश होता.
सेवाभावी उपक्रमांचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला तर रक्तदान सारख्या उपक्रमात तेवढ्याच दात्यांनी भाऊंसाठी पुढाकार घेतला. समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या नेत्याला त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा आज कृतकृत्य केले याची दिव्य प्रचिती आल्याचे पावडे म्हणाले. आपण समाजात जे देतो तेच समाज आपल्याला प्रेमाच्या परताव्याचा रूपात देते सुधिर भाऊंचा हा वाढ दिवस अनेकांना प्रेरणा देणारा, आधार देणारा आणि सेवा देणारा असा सार्थक योग असल्याचेही पावडे यांनी म्हटले आहे.