ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्पर्धा परीक्षा तयारी करणारी मुले-मुलीकरिता मार्गदर्शन शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 28/07/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा या ठिकाणी, पोलिस अधीक्षक नुरूल हसन सर यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण ( IPS) sdpo पुलगाव यांनी वर्धा जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणारी मुले मुली यांचे करिता प्रामुख्याने UPSC, MPSC परीक्षेत यश प्राप्ती करिता मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम करिता प्रमुख मार्गदर्शक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर आणि राज्यसेवा 2021,22022, 2023 चे यशस्वी तसेच उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेले शुभम पाटील हे होते

 कार्यक्रम करिता वर्धा जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विविध भागातील विद्यार्थी आले होते. सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मुले मुली यांना मार्गदर्शन सुरुवातीला शुभम पाटील यांनी केले त्यांनी त्यांचे मार्गदर्शनात, यशस्वी होण्यासाठी निर्धार, निश्चय करायचे आणि पूर्ण पणे स्वतःला झोकून द्यायचे प्रश्नपत्रिका विश्लेषण, प्रश्नपत्रिका सोडविणे आणि त्यानुसार तयारी, अभ्यास कोणत्या प्रकारे, ते मुलखात पर्यंत सर्व मुद्दे व्यवस्थित रित्या समजावून सांगितले, आपला निर्धार पक्का असल्यानंतर यश हमखास मिळते असे सांगितले तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले सर यांनी मार्गदर्शन करते वेळी आपण सर्व जण सामान्य कुटुंब मधून येत असतो, आपण जे ध्येय मनात ठेवणार त्याची मनापासून तयारी करून, आपन ज्या विषयात मागे आहोत त्याचे मधे स्वतःला विकसित करण्यात यायचे, वाचनाची तसेच लिखाणाची तयारी दररोज ठेवायची, अभ्यास फक्त पुस्तकातून होत नाही तर, आपल्या रोजच्या जीवनातून वेगळ्या वेगळ्या माध्यमांतून अभ्यास होत असतो तो आपण कशा प्रकारे आत्मसात करायचं त्याचे वेगवेगळे विस्तारित स्वरूप सांगितले अभ्यास करते वेळी चांगल्या मित्राचा ग्रुप बनवून ग्रुप डिस्कशन तसेच, स्पर्धा परीक्षक प्रश्नपत्रिका कोणत्या स्वरूपात काढतात त्याचा आपण अंदाज बांधून प्रश्नपत्रिका ग्रुप मधे मित्रांनी काढून त्या एकमेकांना सोडवायला देणे, टाइम मॅनेजमेंट, बुक्स सिलेक्षण, मायक्रो नोट्स, इंटरनेट चे वापर, सेल्फ मोटिवेशन परीक्षेत आपले मुद्दे विषयाशी संबधित, अर्थपूर्ण आणि संक्षिप्त असावे असे मुद्दे मांडले आपण दोन ते तीन वर्षात यश नक्की भेटते आणि आपण जर तेथे कमी पडलो तर त्यासाठी प्लॅन B देखील तयार ठेवायचे, स्वतःवर विश्वास असल्यास यश निशीच्ट भेटते असे सांगितले, दोन्ही प्रमुख मार्गदर्शक यांनी स्वतःचे अनुभव तसेच येणाऱ्या समस्या त्यावर कशी मात करायची स्वतः कसे मजबूत व्हायचे कशे यशस्वी व्हायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर उपस्थित मुले मुली यांनी आपल्या मनातील शंका प्रश्न अडचणी विचारले,त्यावर त्यांनी कोणत्या प्रकारे तयारी करायचे सांगून दिले.

कार्यक्रमाचे सुरुवातील जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर यांचे आणि शुभम पाटील यांचे स्वागत करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन psi इटेकर यांनी केले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये