ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती श्री शिवाजी महाराज न. प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय उर्दू विभाग या शाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्या 

जय शिवसंग्राम संघटनेची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज न. प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मराठी व उर्दू असे दोन विभाग आहेत परंतु मराठी विभागामध्ये विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत, जसे की सर्व वर्ग खोल्यांमध्ये लाईट फिटिंग व फॅन बसवलेली आहे, विद्यार्थ्यांना शौचालय व बाथरूम मध्ये नल फिटिंग केलेली आहेत.

तसेच उर्दू विभागातील विद्यार्थ्यांना कोणतेही सोयीसुविधा उपलब्ध नाही उर्दू विभागांमध्ये विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज नाही, ग्राउंड मध्ये हायमास नाही ,वर्ग खोलीमध्ये लाईट फिटिंग व पंखे नाही, विद्यार्थ्यांना शौचालय व बाथरूम मध्ये कनेक्शन नाही. विद्यार्थ्यांना कोणतेही खेळ साहित्य उपलब्ध नाही, सीसीटीव्ही कॅमेरे मध्येही वाढ करण्यात यावी अशी कमतरता असल्यामुळे उर्दू विभागामध्ये पटसंख्या कमी होत चालली आहे या कारणास्तव ऍडमिशन मध्ये घट होत आहे, शासनाने शिक्षणामार्फत अनेक उपक्रम राबवत आहे.

अल्पसंख्याक मुस्लिम समाज दुर्बल घटक असल्याने रोज कमवणे रोज खाणे आहे तरी त्यांनी मुला मुलींना शिक्षणासाठी प्रधान्य देत आहे एक टाइम उपाशी राहूनही मुला-मुलींना शिकवत आहे, मराठी विभागामध्ये सर्व होय सुविधा उपलब्ध आहे तसेच उर्दू विभागांमध्ये का नाही, असे दुजाभाव कशाला या कारणास्तव मुस्लिम समाजामध्ये नाराजी व्यक्त होत आहे, या बाबत चे निवेदन मा. मुख्यअधिकारी अरुण मोकळ यांना देण्यात आले.

निवेदनावर तालुकाध्यक्ष झहीर खान, शहरअध्यक्ष अजमत खान युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, मुबारक चाऊस, शेख इमरान, असलम खान, साजिद खान, राजेश भाग्यवंत, राजू गव्हाणे, अनिस शहा, किशोर वाघ,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये