आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विद्यार्थिनींना २,०५५ सायकलींचे वाटप
देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचा समारोप ; ५५ पारंपरिक गुरूंचा सन्मान

चांदा ब्लास्ट
आमदार किशोर जोरगेवार यांच्या चंद्रपूरात सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचा समारोप विद्यार्थिनींना सायकल वाटप आणि ५५ पारंपरिक गुरूंच्या सन्मान सोहळ्याने संपन्न झाला. शकुंतला लॉन येथे पार पडलेल्या या भव्य समारोप कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वी वर्गातील २,०५५ विद्यार्थिनींना सायकलीचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील ५५ गुरूजनांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर उपक्रमासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संजय चिद्रावार, भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, अमेरिकेतील भारतीय वैद्यानिक अनुप वाघ, संदिप बांटिया, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार आसिफ रझा शेख, तुषार सोम, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, नामदेव डाहुळे, मंडळ अध्यक्ष रवी जोगी, सुभाष आदमाने, रवी गुरनुले, वंदना हातगावकर, सविता दंढारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि ,एकूण १०,००० सायकली वाटप करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. मुलींच्या चेहऱ्यावरचे हसू हेच या उपक्रमाच्या यशाचे प्रतीक आहे. शिक्षण हा तुमच्या आयुष्याचा पाया आहे. आज तुमच्या हातात सायकल आहे, ती केवळ वाहन नाही, तर शिक्षणाच्या दिशेने वेग देणारे साधन आहे. मनापासून शिक्षण घ्या, आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे ऐका. सोशल मीडियाच्या आहारी न जाता ज्ञानाच्या जवळ रहा. स्वप्न मोठी ठेवात प्रामाणिक मेहनत ठेवा असे ते म्हणाले.
पडोली, संजय नगर या टोकावरच्या भागातून मुली शहरात पायदळ शाळेत जाताना पाहून मी गरजू विद्यार्थिनींसाठी सायकल वाटपाचा संकल्प केला होता. आज तो पूर्ण करताना समाधान वाटते. मतदारसंघातील सुमारे ८८ शाळांमधून २,०५५ पात्र विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. पण यातच थांबायचं नाही – १० हजार सायकली वाटण्याचे आपले उद्दिष्ट आहे. परिस्थितीमुळे शिक्षण थांबू नये म्हणून अम्मा की पढ़ाई या उपक्रमातून आम्ही २८४ विद्यार्थ्यांना निशुल्क दर्जेदार शिक्षण देत आहोत असेही त्यांनी सांगितले. सेवा सप्ताहाच्या निमित्ताने गेल्या आठवडाभरात आपण विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवले. मात्र, आजच्या कार्यक्रमातील विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हास्य आणि नव्या आशेचा प्रकाश पाहून आमचाही सारा थकवा दूर झाला असून, अशा सामाजिक उपक्रमांना अधिक जोमाने गती देण्याची उर्जा मिळाली असे ते म्हणाले. कार्यक्रमात मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विद्यार्थिनींसह पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
४०० पेक्षा अधिक उपक्रमांतून साजरा झाला सेवा सप्ताह; ३ हजार रक्तदात्यांचे योगदान
सेवा सप्ताह अंतर्गत ४०० हून अधिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मतदारसंघात घेण्यात आलेल्या ५५ रक्तदान शिबिरांमध्ये ३ हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखवली. हे चंद्रपूरातील आजवरचे सर्वात मोठे रक्तदान अभियान ठरले.
तसेच, ७५ मंदिरांमध्ये महाआरती, ७९ ठिकाणी योग शिबिर, ६८ ठिकाणी वृक्षारोपण, १७ ठिकाणी शालेय साहित्य वाटप, रोजगार मेळावे, कर्तव्य सेतूचे उद्घाटन, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता अभियान, सामूहिक सूर्यनमस्कार, महाआरोग्य शिबिरे, राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाचा रुद्राभिषेक, कावड यात्रा, डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन, अम्मा संस्कार केंद्र, कार्यकर्ता मेळावे, पक्षप्रवेश कार्यक्रम, तसेच विविध धार्मिक स्थळी सामाजिक उपक्रम अशा अनेक सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
५५ पारंपरिक गुरूंचा सन्मान..
समारोपाच्या दिवशी मंगळवारी, विविध पारंपरिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील ५५ गुरूजनांचा सत्कार आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार प्राप्त गुरूंमध्ये वकिली क्षेत्रातील रविंद्रजी भागवत, गायनिक डॉ. उषा अरोरा, योगगुरु शशिकांत मस्के, कथ्थक गुरू चारुशिला फेकडे, गरबा शिक्षक गुरुरूप मसराम, भरतनाट्यम शिक्षक प्रशांत कत्तूरवार, शिल्पकार सुहास ताटकंटीवार, शिंपी वर्गातील उबाळकर, आदर्श शिक्षिका विजया मुलकावार, दाई अरुणा सामंतपल्लीवार, लाठी-काठी शिक्षिका खोब्रागडे, हॉकी प्रशिक्षक जनक खान पठाण, इलेक्ट्रिशियन नरेश वानखेडे, ग्रामगीताचार्य अण्णाजी ढवस, हरिपाठ गुरू सिंधु चौधरी, स्वामी समर्थ संस्कार केंद्राचे सुधाकर टिपले, टायपिंग शिक्षिका विजया कोटकर, वेल्डर राजू वाहाडे, योग शिक्षिका सुवर्णा लोखंडे, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक नरेश भुते, न्हावी शंकर चावके यांच्यासह इतर गुरूंचा समावेश होता.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, कोणत्याही समाजाची खरी प्रगती ही रस्ते, इमारती, सुविधा यावर नव्हे, तर संस्कार, शिक्षण, मूल्य आणि मार्गदर्शनावर अवलंबून असते. हे कार्य पार पाडणारे गुरू केवळ शाळांपुरते मर्यादित नाहीत. कला, क्रीडा, आरोग्य, अध्यात्म, शेती, समाजसेवा यांसारख्या सर्वच क्षेत्रातील मार्गदर्शक हेही समाजाचे ‘गुरू’ आहेत. आजचा हा सन्मान म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा आणि आदराचा मुजराअसल्याचे ते यावेळी म्हणाले.