कृषीकंपन्यांची पंचगंगा सीड्स कंपनीला औद्योगिक भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
उंबरखेड येथे आयोजित रावे उपक्रमा मध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थिनींनी बीज उत्पादक पंचगंगा सीडस प्रा. ली औद्योगिक ठिकाणी नावीन्यपूर्ण भेट देत भाजीपाला बीज उत्पादन या विषयी सखोल माहिती जाणून घेतली.
तसेच शेतकऱ्यानंपर्यंत योग्य ते मार्गदर्शन होईल. पंचगंगा येथे कार्यरत असलेले सुरेश सातभाये यांनी बीज उत्पादक याविष्यात सखोल मार्गदर्शन केले. तसेच मिरची ,टोमॅटो, वांगी, कांदा, भेंडी यांचे शेतकऱ्यामार्फत बीज उत्पादन प्रक्रिया तसेच शेतकऱ्यानं होणारा आर्थिक फायदा आणि गुणवत्ता आणि दर्जा व्यवसायिक आणि उदरनिर्वाह साठी निरोगी कसा असला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले .तसेच बीज उत्पादन च्या वेळेस घेण्याची काळजी आणि शास्त्रीयरित्या कोणतीही जनुकीय भेसळ न होता बीज उत्पादन कसे घ्यावे याचे सखोल मार्गदर्शन केले.
बीज साठवण आणि विपणन (मार्केटिंग)कसे असावे तसेच साठवण गृह कसे असावे व बीज साठवण कशी करावी बीज (पॅकेजिंग) साहित्य कसे आणि कसे करावे आणि पॅकेजिंग च माध्यमातून दर्जा आणि गुणवत्ता मार्केटिंग च दृष्टिकोनातून कशी टिकवून ठेवावी याचे मार्गदर्शन लाभले.
समर्थ कृषी महाविद्यालय चे प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे इन्चार्ज मोहजित सिंग राजपूत, वनस्पतीशास्त्र विभाग प्रा.पवार यांचा मार्गदर्शनात भेट पार पडली. यावेळी कृषी कन्या जयश्री पाटोळे, नेहा पडघाण, गायत्री शिंगणे, ऋतुजा वाघ, श्वेता पवार, टिना झोडे, नेहा लहाने, दुर्गा मापारी, अंजली खीराडे यांचा समावेश होता.