ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरु गणेश अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, चंद्रपूरची दशकपूर्ती व ग्राहक सोहळा मोठ्या थाटात साजरा

चांदा ब्लास्ट

गुरु गणेश अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., चंद्रपूरच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त ग्राहक सोहळा व स्नेहमेळावा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटात पार पडला. या कार्यक्रमाला चंद्रपुर शहरातील मान्यवर, संस्थेचे सदस्य, ठेवीदार, संस्थेचे ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व श्री गणेश वंदनेने झाले. कार्यक्रम चे अध्यक्षस्थानी एडवोकेट वासुदेवराव खेळकर, माजी संचालक चंद्रपुर जिल्हा माध्यवर्ती सहकारी बैंक, चंद्रपुर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जुगल किशोर सोमानी, अध्यक्ष रामाराव तलाव बचाव संघर्ष समिति चंद्रपुर, मनीषभाई सूचक संस्थेचे अध्यक्ष गुरु गणेश अर्बन को – ऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लि, चंद्रपुर, तसेच चंद्रपुर महानगर चे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रम ची प्रस्तावना व मागील 10 वर्षाचा लेखा-जोखा संस्थाचे सचिव हरीश मुथा यांनी मांडला यात त्यांनी संस्था कशी सुरु झाली, ती आज कशी गतिमान, प्रगतिपथावर आहे आणि ती मागील 10 वर्षा पासून ऑडिट मध्ये “अ” वर्गात आहे ती सविस्तार माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात वासुदेवराव खेळकर यांनी संस्थेच्या १० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत, ग्राहकांचा विश्‍वास व कर्मचारी, संचालक मंडळ यांच्या सहकार्यामुळे आज संस्थेने ठेवी, कर्जवाटप व सेवांमध्ये भरीव प्रगती साधली असल्याचे नमूद केले. प्रमुख अतिथि जुगलकिशोर सोमानी यांनी मागील 10 वर्षात संस्थेचे प्रगति प्रथावर प्रकाश टाकला व या प्रगति वर आनंद व्यक्त केला. त्यांनी संस्था अशीच प्रगतिकरो अशी शुभेच्छा दिल्या.

संस्थाचे संचालक जितेन्द्र जोगड़ यांनी संस्थाच्या विविध योजना बद्दल, ठेवी बद्दल, कर्ज पूरवठा बद्दल, बैंक लॉकर, नविन फिक्स डिपाजिट स्कीम बद्दल सविस्तार माहिती दिली. जास्तीत जास्त नागरिकांनी संस्थाशी जुडावे अशी अपील केली.

प्रमुख अतिथींच्या हस्ते गुणवंत ठेवीदार, नियमित हप्ते भरणारे ग्राहक, डेली कलेक्शन एजेंट व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने नव्या डिजिटल सेवा, विविध योजना, ग्रामीण भागात नविन शाखा सुविधा लवकरच सुरु होणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दीपमाला अमृतकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश नन्दनकर यांनी मानले. या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. महावीर सोइतकर, सचिव हरीश मुथा, संचालक जितेन्द्र जोगड़, देवेंद्र वर्मा, राजेंद्र शास्त्रकार, अजय कोतपल्लिवार, निर्मल भंडारी, डॉ कीर्ति साने, वर्षा ताटीवार, राजरतन गेड़ाम व कर्मचारी मोहन शेडमाके, मनीष उपरे, अक्षय शिरसागर, योगिता पिसोड़े, वरुण स्वान यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी अथक प्रयास केले. सभासद, महिला सदस्य व नागरिकांनी उपस्थित राहून संस्थेच्या प्रगतीच्या कामांना शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये