ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुश्राव्य गायनाने भद्रावतीकर मंत्रमुग्ध

गुरूपौर्णिमा निमित्ताने संगीत मैफल संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

स्थानिक बगडेवाडी येथे संपन्न झालेल्या स्वर्गीय सिंधुताई व श्री महादेवराव लक्ष्मण पावडे यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित संगीत मैफिलीत पुणे येथून आलेल्या गायकांच्या सुश्राव्य गायनाने भद्रावतीकर रसिक मंत्रमुग्ध झाले. ३ जुलैला गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या मैफलीमध्ये पुणे येथील प्रसिद्ध संगीत कलावंत पंडित बाळासाहेब वाईकर, निवृत्ती धाबेकर, पांडुरंग पवार यांच्यासह सुधांशू धाबेकर,सुरेश कुडे, बालाजी कामडी, सुधाकर जाधव,सचीन मत्ते यांनी संगीतातील विविध नैपुण्य सुरेल आवाजात सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. चंद्रपूरचे माजी पोलीस उपाधीक्षक श्रीराम तोडासे, सह्याद्रीचा राखणदारचे वरिष्ठ संपादक तथा स्तंभलेखक डॉ. यशवंत घुमे व भद्रावती नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर संगीत मैफल सुरू झाली.यावेळी शास्त्रीय संगीत,गझल,ठुमरी,अभंग,भजन, गौळण, क्लासिक संगीत व रसिकांच्या आवडीची गाणी गावून कलावंतांनी रसिकांना मनोरंजनाची मेजवानी दिली. या मैफलीचे प्रास्ताविक डॉ. मयुरा अवताडे, संचालन संजय घुगूल ,आभारप्रदर्शन दशरथ पावडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनाली व सचिन पावडे, दशरथ पावडे, घनश्याम झाडे, मोहन अवताडे संजय जेनेकर,जितेश उरकुडे, अनिल रामटेके यांनी परिश्रम घेतले. या मैफिलीत संगीत ऐकण्यासाठी भद्रावती शहरातील रसिक श्रोत्यांसह चंद्रपूर, वरोरा, वणी यांसह विविध शहरांतील अनेक रसिक उपस्थित झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये