ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्तव्यनिष्ठ लाईनमनची झालेली बदली रद्द करण्यासाठी ४ ग्रामपंचायतींचे सरपंच सरसावले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

वीज ग्राहकांचे हित जपणारे विजतंत्री (लाईनमन) कर्मचाऱ्याची झालेली बदली रद्द करावी. अशी मागणी तालुक्यातील पानवडाळा, बेलोरा-टाकळी, जेना, कांन्सा या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आपल्या पदाधिकारी आणि गावकऱ्यांसह महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे विभागीय कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनात द्वारे केली आहे. बदली रद्द न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनात दिला आहे.
पानवडाळा, बेलोरा- टाकळी, जेना, कान्सा या भागात गेल्या ६ वर्षांपासून कार्यरत असलेले विजतंत्री(लाईनमन) राजेश घागरगुंडे यांची बदली झाली. ते या भागात रुजू झाल्यापासून त्यांनी आपल्या कामाने वीज ग्राहकांना मनात ठसा उमटविला. अनेक शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल आणि वीज ग्राहकांचे वीज बिल हे आपल्या कौशल्याने वितरण कंपनीत जमा करावयास सांगत असे. त्यांच्या शब्दाचा मान देऊन ग्राहक वीज बिलाचा भरणा करीत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीला त्यांनी फायद्यात आणले. अशा कर्तव्यध्यक्ष वीजतंत्री कर्मचाऱ्याची झालेली बदली या भागातील जनतेला धक्का देऊन गेली. त्यामुळे घागरगुंडे यांची बदली रद्द करावी. म्हणून पाणवडाळा ग्रामपंचायत सरपंच प्रदीप माकुलकर, बेलोरा- टाकळी सरपंच संगीता देहरकर, जेना सरपंच प्रभा बोढाले, उपसरपंच हरिश्चंद्र आस्वले , कान्सा सरपंच मयूर टोंगे यांचे सह ग्रामपंचायत सदस्य, गावकरी यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे विभागीय कार्यकारी अभियंता नवघरे यांना निवेदन दिले. बदली रद्द न केल्यास आंदोलन उभारू असा इशारा निवेदनांचे शेवटी त्यांनी दिला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये