सामाजिक बांधिलकी जोपासत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे अन्यायाला वाचा फोडणारे भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कर्दनकाळ ठरलेले राज्य शासनाकडून अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त झालेले चंद्रकांत खरात यांनी आपणाला व आपल्या परिवाराला या समाजाचे काहीतरी देणे लागते ही भावना मनात ठेवून शिक्षणाचे जरी व्यासपीठ उपलब्ध असले तरी आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या विद्यार्थ्यांना दिनांक 11 जुलै 25 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल मधील व इतर शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
यासाठी त्यांना श्री व्यंकटेश कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मधुकर जाधव यांनी व जानराव गायकवाड यांनी भरीव मदत केली. याबाबत सविस्तर असे की शहरासह जिल्ह्यात समाजपयोगी कामे व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे चंद्रकांत खरात यांनी या नपचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून गरजवंत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा निर्णय घेतला व प्रत्यक्ष त्यांचे सहकारी प्रा. मधुकर जाधव यांना सोबत घेऊन शाळेला भेटी देऊन प्रत्येक वर्गात जाऊन ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे त्यांची शिक्षण घेण्याची खूप इच्छा आहे मात्र घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे अपेक्षित असे शालेय साहित्य घेण्यामध्ये असमर्थ आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड करून जवळपास 380 गरजवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग रजिस्टर पेन पेन्सिल व परीक्षेचे पॅड व इतर शालेय साहित्याचे वाटप केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, मुख्याधिकारी अरुण मोकळ शाळेचे मुख्याध्यापक संजय देशमुख, प्रभारी पोलीस निरीक्षक आशिष रोही, नायब तहसीलदार सायली जाधव, एपीआय हेमंत शिंदे, शाम गुजर, गजानन तिडके, अमोल इंगळे, सन्मती जैन, मुशिर कोटकर, पंचशीला खरात, संध्या सूर्यकांत खरात, बेबी चंद्रकांत खरात, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक चंद्रकांत खरात, प्राध्यापक मधुकर जाधव, जानराव गायकवाड सह या शाळेचे शिक्षक वृंद कर्मचारी शहरातील पत्रकार बांधव सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर ज्या ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना हे शालेय साहित्य मिळाले त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. प्रास्तविक प्रा. मधूकर जाधव तर संचलन राजेश खोडतोरे व आभार विजय तायडे यांनी मानले.