ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरूंचा सन्मान करून महात्मा गांधी विद्यालयात ‘गुरुपौर्णिमा’ साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  आषाढी पौर्णिमेनिमीत्त महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडू न सन्मान करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. संपूर्ण विश्वाला ज्ञानाने प्रकाशमान करणाऱ्या विश्वगुरु महर्षी व्यास यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही पौर्णिमा व्यास-पौर्णिमा म्हणून देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.

याच व्यासपौर्णिमेचे औचित्य साधून महात्मा गांधी विद्यालयातील सर्व नवनियुक्त शिक्षणसेवक तसेच इयत्ता ९ वी फ व इयत्ता ९ वी ई या वर्गाच्या वतीने सर्व जेष्ठ-श्रेष्ठ शिक्षकांच्या सन्मानाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्तव्यदक्ष प्राचार्य मा. साईनाथ मेश्राम हे उपस्थित होते.

महर्षी व्यासांच्या महान लेखन साहित्याचा परिचय करून देतांना मेश्राम म्हणाले,  व्यासांनी महाभारत लिहून या जगावर फार उपकार केलेले आहेत. महाभारतातील विविध निती – विदूरनिती, धर्मनिती शकुनिनिती, भीष्मनिती, श्रीकृष्णनिती या सुप्रसिद्ध आहेत. ब-याचदा या नितींचा वापर आपल्‌या जीवनात केल्याने बराच फायदा होतो.”

या कार्यक्रमाचे पाहूणे म्हणून महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते शाळेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांनी देखील त्यांचा सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उप‌प्राचार्य प्रफुल्ल माहूरे, उपमुख्याध्यापक विजयकुमार डाहूले, पर्यवेक्षिका माधुरी मस्की सर्व जेष्ठ-श्रेष्ठ शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षकांच्या वतीने प्रिया दुर्गे- कांबळे, सोपान लाड, रुपेशकुमार वधारे, अंकुश काकडे यांनी गुरुंच्या सन्मानार्थ मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरसिंह पांचाळ यांनी केले तर आभार गौरव पानघाटे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये