ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

स्व. वामनराव गड्डमवार यांचे स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री स्व. वामनराव गड्डमवार यांचे स्मृतीप्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळयाचे आयोजन (दि. 11) रोजी करण्यात आले आहे. यात मंडळाच्या अंतर्गत संचालीत श्विशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली, कुनघाडा, भेंडाळा, मारोडा, बोथील येथील वर्ग 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत फेब्रुवारी व मार्च 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुंणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे.

सदर कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आला असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन राजाबाळ संगिडवार, प्रमुख अतिथि म्हणुन सावली न.पं. चे अध्यक्ष साधनाताई वाढई, उपनगराध्यक्ष संदिप पुण्यपकार, गटविकास अधिकारी संजय नैताम, पोलीस निरिक्षक प्रदिप पुल्लरवार, सहा.पोलीस निरिक्षक सचिन मुसळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे हे राहणार असुन गोंडवाना विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ हेमराज निखाडे हे मार्गदर्शक म्हणुन लाभणार आहेत.

या कार्यक्रमाला परिसरातील जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र मुप्पावार यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये