ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.प.प्राथ.शाळेत वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली येथील जि.प.प्राथ.शाळा क्र. 2 येथे एक पेड मा के नाम या संकल्पनेत वृक्षारोपन कार्यक्रम (दि.10) रोजी घेण्यात आला. मायेची उब हवी असेल तर आईच्या नावाने प्रत्येक भारतीयांनी एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे कारण पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्रशासनाने 140 कोटी जनतेच्या खाद्यावर 140 कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपविली आहे. आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात नक्कीच सुखाची सावली देईल व पर्यावरणाचे महत्व विद्यार्थी अंगीकारतील या उदात्त हेतुने जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रदिप पुल्लरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, शेतकरी राईस मिल चे अध्यक्ष विलास यासलवार, नगरसेवक प्रितम गेडाम, वनरक्षक मुरकुटे, जेष्ठ पत्रकार उदय गडकरी, उमेश वाळके, इंजि. हिरालाल घडसे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशिष दुधे, सदस्य संजय घागरे, यशपाल गोंगले, सामाजिक कार्यकर्ता धर्मेश बोरकर, निखील दुधे, आकाश खोब्रागडे, मुख्याध्यापिका अंजु वाकडे, सहा. शिक्षक सतिश चलाख, सुची रायपुरे आदि मान्यवर उपस्थित होते.

तर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यशपाल गोंगले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्य शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनाचे वाटप करुन चिमुकल्यासोबत आपला वाढदिवस साजरा केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये