ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रशासनाकडून पूर परिस्थितीची पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यातच गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्यामुळे वैनगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात पूर सदृश्यस्थिती निर्माण झाली.
प्रशासनाकडून वैनगंगा नदी काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून ब्रह्मपुरीचे तहसीलदार सतीश मासाळ तसेच पोलीस इन्स्पेक्टर प्रमोद बांनबले यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला.
(छायाचित्र: नंदकिशोर गुड्डेवार ब्रह्मपुरी)