ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाणीपट्टी कर वसुलीसाठी वॉर्डसखींच्या माध्यमातून विशेष मोहीम सुरू

घरीच पाणी देयक भरण्याची सुविधा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने पाणीपट्टी कराची वसुली अधिक प्रभावीपणे करण्यासाठी घरोघरी भेट देऊन कर वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी 69 वॉर्डसखी चंद्रपूर मनपातर्फे नेमण्यात आल्या असुन आता घरीच पाणी देयक भरण्याची सुविधा नागरिकांना मिळत आहे.

   या मोहिमेंतर्गत वॉर्डसखी थेट नागरिकांच्या घरी जाऊन पाणीपट्टी कराची माहिती देत असून, त्यांच्याकडून थेट कर वसुली देखील करण्यात येत आहे. ही कार्यपद्धती पारदर्शक असून प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन देयक भरण्याचा नागरिकांचा त्रास वाचणार आहे. पाण्याचे देयक प्राप्त होताच 15 दिवसांच्या आत ऑनलाईन पद्धतीने कर भरल्यास नागरिकांना 10% सवलत तर नंतरच्या 15 दिवसात देयक अदा करणाऱ्यांना 5 टक्के सवलत दिली जात आहे.

   सर्व वॉर्ड सखींना मनपातर्फे पीओएस मशीन (Point of Sale) देण्यात आली असुन याद्वारे त्यांना नागरिकांकडून ऑनलाईन देयक भरून घेता येते. भरलेल्या देयकाची पावती ही दुसऱ्या दिवशी वॉर्डसखींद्वारे प्रत्यक्ष रूपात देण्यात येईल. देयक भरतांना कुणीही रोख रकमेचा वापर करू नये अथवा रोख रक्कम वॉर्ड सखींना देऊ नये ,ही सेवा केवळ ऑनलाईन कराचा भरणा करण्यासाठी असल्याने या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

ओळखपत्राद्वारे करावी खात्री –

  चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सर्व वॉर्डसखींना मनपाचे ओळखपत्र देण्यात आले असुन त्याद्वारे सदर व्यक्ती अधिकृत असल्याची खात्री करता येईल. त्याचबरोबर मनपाच्या वेबसाईटवर त्यांचा नियुक्ती आदेश,त्यांची यादी,मोबाईल क्रमांक व फोटो उपलब्ध असुन त्याद्वारे सुद्धा खात्री करता येते.

कर भरण्याकरिता खालील माध्यमांचा वापर करता येईल:

पीओएस मशीनद्वारे

क्यूआर कोडद्वारे

गुगल पे

फोन पे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये