ब्रम्हपुरी नगर कार्यकारिणी घोषणा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- राष्ट्रीय विद्यार्थी दिवस तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिना निमित्त यशवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सत्कार करण्यात आला तसेच ब्रम्हपुरी नूतन नगर कार्यकारिणी घोषणा करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी या सभागृहात हे कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर विभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे संघ चालक, प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य वैदेही ताई मुडपल्लीवार, जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. कुलजीत कौर गिल, अभाविप जिल्हा सह संयोजक सविता सरकार, अभाविप प्रांत सचिवालय सचिव रितिक जी कानोजिया, अभाविप ब्रम्हपुरी नगर विस्तारक जय जी टोंगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा प्रमुख प्राध्यापिका डॉ. कुलजीत कौर गिल यांनी ब्रम्हपुरी नूतन नगर कार्यकारिणी घोषणा केली.
यामध्ये नगर मंत्री कल्याणी मानगुळदे, नगर सह मंत्री अंकित मेश्राम, सचिन नंदनवार, अंबिका नाकतोडे, यशस्वी ठाकरे, नगर कार्यालय मंत्री कार्तिक चुकाबोटलावार, नगर कोष प्रमुख मोहित कावळे, नगर सोशल मीडिया संयोजक शिल्पा सरकार, नगर मीडिया संयोजक संस्कृती राऊत एस.एफ.डी. संयोजक नीलिमा गेडाम, एस.एफ.एस.संयोजक तन्मय पिपरे, नगर राष्ट्रीय कला मंच संयोजक नंदिनी तुम्मे, नगर खेलो भारत संयोजक गौरी पेल्लारवार, नगर कार्यकारिणी सदस्य कल्याणी सुखदेवे, पुजा मेश्राम,धनश्री शेंडे, राजकुमार गेडाम, सविता सरकार, जय टोंगे, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, राहुल जी श्यामकुवर व इतर कार्यकर्त्याची घोषणा झाली.
तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिवसा निमित्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम राबवत असते. या वर्षी देखील हार्दिक सोहळा ९ जुलै ला ब्रम्हपुरी नगरात राबवण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विभाग संघ चालक जयंत जी खरवडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले कि विद्यार्थी परिषद ही कोणत्याही राजकीय पक्षाची नाही तर फक्त विद्यार्थ्यांची संघटना आहे.
विद्यार्थी परिषद नेहमी राष्ट्र पुनर्निर्माचा विद्यार्थी घडवण्याचा सुसंस्कार देण्याचा काम करत असेते या साठी वेगवेगळे उपक्रम रबावत असते.
तसेच प्रमुख वक्ता अभाविप राष्ट्रीय कारकर्णी सदस्य वैदेही ताई मुडपल्लीवार यांनी परिषदेची भूमिका मांडली व सांगितल कि विद्यार्थी परिषद शिक्षण क्षेत्रातच कशाप्रकारे काम करते विद्यार्थ्यांचे अडचण कशा प्रकारे सोडविण्यासाठी प्रयत्न करते.
या कार्यक्रमात विद्यार्थी त्यांचे पालक व शिक्षक उपस्थित होते.
तसेच वंदे मातारम् च्या जय घोषत कार्यक्रम संपन्न झाला.