ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महत्वाची सूचना : डिपॉझिट दैनंदिन ठेव जादा व्याजाचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक

सावधगिरी व सतर्कता बाळगुन व्यवहार करण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

कारंजा घाडगे शहरामध्ये सन 2011 पासुन JSV डेव्हलपर इंडिया लिमीटेड व जय विनायक बिल्ड क्रॉप लिमीटेड या कंपन्या आरोपीतांनी स्थापन करून परिसरातील गोरगरीब लोकांना रेग्युलर डिपॉझीट व फिक्स डिपॉझीट, दैनदिन ठेव यावर जास्त व्याजाचे आमीष दाखवुन एजन्ट मार्फत लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करून लोकांचे पैसे परतफेड न करता आरोपीतांनी कंपन्या बंद करून लोकांचा विश्वासघात करून फसवणुक केल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन कारंजा घाडगे येथे अप क्र 257/2019 कलम 406,409,420,120 (ब) भादवि सहकलम 3,4,8, एमपीअयडी अॅक्ट सहकलम 21,22,23,25 BUDS Act. अन्वये दिनांक 03/08/2019 रोजी दाखल असून सदर कंपन्यामधील एकुण 630 गुंतवणुकदारांनी एकुण 2,49,28,240 रुपयाची गुंतवणुक केलेली असुन सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा वर्धा येथे सुरु आहे.

सदर गुन्हा हा सन 2019 मध्ये दाखल असून 6 वर्षा पासुन फरार असलेले आरोपी 1) देवेंद्र शोभेलाल नागपुरे वय 47 वर्ष 2) प्रमोद आंदनराव कुकडे दोन्ही रा. दवनीवाडा जिल्हा गोंदिया यांना दिनांक 24/6/2025 रोजी अटक करण्यात आली असून तसेच सदर कंपनीचा डायरेक्टर दिनेश हेमराज टेभरे वय 46 वर्ष रा. आमगाव जि. गोंदिया हा गेल्या सहा वर्षा पासुन फरार होता त्यास दिनांक 8/07/2025 रोजी अटक करण्यात आली असुन सदर आरोपी हा दिनांक 15/07/2025 पावेतो पोलीस कस्टडी मध्ये आहे. सदर आरोपीतां विरुध्द बाहेर राज्य मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र येथे 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत. आता आर्थिक गुन्हे शाखा येथील अधिकारी हे आरोपीने फसवणुक करून त्या रक्कमेतुन जी मालमत्ता विकत घेतलेली आहे. ती मालमत्ता गुन्हयात सलग्न करण्यात आली असून सदर मालमत्तेचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फतीने शासनाकडे पाठविण्यात आला आहे. गुन्हयातील इतर फरार आरोपीतांचा शोध घेणे सुरू असुन त्यांना गुन्हयात अटक करण्यात येते.

सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा वर्धा येथे मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा वर्धा पुंडलिक भटकर यांचे मार्गदशनात पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक शांताराम मुदमाळी, सफौ गजानन काळे, संतोष जयस्वाल, पो.हवा. शैलेश भारशंकर, विरेद्र कांबळे नापोका राजेश पाचरे, देवेंद्र कड्डु, मनोज झाडे, महीला पोलीस रोशनी ठाकरे करीत आहेत.

मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांनी वर्धा जिल्हयातील नागरीकांनी अशा जास्त व्याज दराचे आमिष दाखविणाऱ्या कंपन्या / बँकामध्ये सावधगिरी व सतर्कता बाळगुन व्यवहार करण्याचे आव्हान केलेले आहे. तसेच कोणतेही फसवे कॉल आल्यास आपले बैंक खाते, ओटीपी नंबरची माहीती कॉलर यांना न देण्याचे आव्हान केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये