ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या दारूची वाहतूक

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगाव येथे पेट्रोलिंग करीत असताना मुखबीर कडून खात्रीशी माहिती मिळाली की आरोपी नामे रोशन फघूलाल साहू वय 35 वर्षे राहणार नाचणगाव हा अवैधरित्या दारूची वाहतूक करीत आहे.

  यास नाकाबंदी करून हुंडाई क्रेटा चार चाकी वाहन थांबून चेक केले असता चार चाकी वाहनाच्या डिक्की मध्ये व मागील सीटवर खाकी खोक्यामध्ये 48 सीलबंद शिश्या देशी दारू न भरलेले 12 खोके एकूण सीलबन शिष्या 576 अंदाजे किंमत एक लाख पंधरा हजार दोनशे रुपये व क्रेटा गाडी किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण मुद्देमाल 16 लाख 15 हजार दोनशे रुपयांचा जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगांव राहुल चव्हान सा.श्री यशवंत सोळसे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगांव यांचे मार्गदर्शनात पीएसआय गौरी शंकर वर्मा डीबी पथक पोलीस हवालदार रितेश गुजर सोबत विनोद राजा गोपाल बावनकर राजू वैद्य अजय अनंतवार गणेश इंगळे पोलीस स्टेशन पुलगाव यांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये