ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैनगंगेच्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ गावे प्रभावित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी:- वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रह्मपुरी तहसीलमधील ८ गावांना पुराचा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासन बचाव पथकांसह सज्ज आहे. गोसे खुर्द धरणातून सध्या वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे.याचा परिणाम चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तहसीलवर झाला आहे.

नदीकाठावर वसलेली लाडज, पिंपळगाव भोसले, भालेश्‍वर, चिखलगाव, अरहेर नवरगाव आणि बेळगाव ही गावे बाधित झाली आहेत. सध्या १४ कुटुंबांना बचाव पथकाने केलेल्या कामगिरीत वाचवण्यात आले आहे.वैनगंगा नदीची पाण्याची पातळी सतत वाढत आहे आणि ब्रह्मपुरीतील अनेक नद्या आणि नाल्यांच्या पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे.

मुडझा-गंगलवाडी आणि गांगलवाडी-आरमोरी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यातच गांगलवाडी कडून आरमोरी कडे जाणारा एक टँकर पुराच्या पाण्यात अडकून आहे. जर वैनगंगा नदीजर पूर आला तर तहसीलमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये