ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण जाहीर

महिला आरक्षणासह 2025-2030 कालावधीसाठी आरक्षण यादी प्रसिद्ध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  देऊळगाव राजा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण आज 9 जुलै रोजी घोषित करण्यात आले. हे आरक्षण महिला आरक्षणासह करण्यात आले असून, याबाबतचा अधिकृत कार्यक्रम तहसील कार्यालयात पार पडला.

या आरक्षण जाहीर कार्यक्रमास नियंत्रण अधिकारी म्हणून सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे हे उपस्थित होते. माननीय तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण यादी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमास नायब तहसीलदार सायली जाधव, निवडणूक विभागातील महसूल सहाय्यक प्रशांत वाघ आणि अमोल जाधव यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये