गटार योजनेमुळे नगर परिषद क्षेत्रात खड्डे पडून वाहने आणि पायदळ चालणाऱ्याना नाहक त्रास
नगर परिषदेचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभीड नगर परिषद क्षेत्रात पाणी पुरवठा योजना व गटार योजनेचा फज्जा उडाला असून अनेक ठिकाणी गटार योजनेमुळे रस्त्याची वाट लागली असून गटार योजनेच्या माध्यमातून रस्त्याचे दोन भाग होत असून त्या ठिकाणी फक्त गट्टी टाकून दबाई होत नसल्याने आणि सतत पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून खड्डे पडले आहेत यामुळे चारचाकी वाहने दुचाकी वाहने आणि पायदळ चालणाऱ्याना त्रास सहन करावा लागत असून नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे.
गेल्या काही वर्षांत प्रशासक असलेल्या अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात न घेतल्याने नगर परिषद क्षेत्रात विकासाची गंगा येण्यापेक्षा गटार गंगा कशी वाढेल यावर भर देण्यात आल्याचे दिसून आल्याने नगर परिषद क्षेत्रात विविध समस्या निर्माण झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी देशमुख कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.