घुग्घुस : मित्राच्या वाढदिवसानिमित्त दिलीप पिट्टलवार यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळांचे वाटप

चांदा ब्लास्ट
घुग्घुस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) घुग्घुस शहर अध्यक्ष दिलीप पिट्टलवार यांनी आपल्या मित्र रविश सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, घुग्घुस येथे रुग्णांना फळांचे वाटप केले.
या प्रसंगी दिलीप पिट्टलवार यांनी रुग्णांच्या लवकर बरे होण्याची सदिच्छा व्यक्त केली तसेच आपल्या मित्र रविश सिंग यांच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना केली. रुग्णालयात उपस्थित रुग्ण व नातेवाईकांनी या उपक्रमाबद्दल पिट्टलवार यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास गोविंद गोगुला, प्रीतम नागुलवार, कुणाल गेडाम, रोहित रावेल्ली आणि संपत आरेल्ली हे मित्र उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक सेवाभावातून पार पडला.
स्थानिक नागरिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मकता आणि माणुसकीची भावना वाढवतात.