ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भर पावसात ब्रह्मपुरी नगर परिषदेत भाजपाने फेकले चिखल

भूमिगत गटार योजनेतील अनियमितता व चिखलयुक्त परिस्थितीवरील भोंगळ कारभारा विरोधात भाजपा ब्रह्मपुरीचे तीव्र आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी नगर परिषद क्षेत्रात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारने या प्रकल्पासाठी मोठा निधी ब्रह्मपुरी नगर परिषदेला दिला परंतु या कामामध्ये मोठी अनियमितता असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत शहरातील विविध भागात चिखलयुक्त परिस्थिती निर्माण झाली असून रोज नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. दिनांक २६ जून रोजी भाजपा शिष्टमंडळाने नगर परिषद कार्यालयात निवेदन देत सदर समस्या तातडीने दूर करण्याची मागणी केली होती.

पुढील सात दिवसांत समस्या न सोडविल्यास चिखलफेक आंदोलन करण्याचा इशारा शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे यांनी दिला होता. सात दिवस उलटून ही नगर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात न झाल्याने भाजपा नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. ०८ जुलै रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भर पावसात आंदोलन करण्यात आले. भर पावसात ही मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने शहरातील विविध भागातून जमा केले चिखल नगर परिषदेत फेकण्यात आले. यावेळी नगर परिषद प्रशासकांकडून पुढील चार ते पाच दिवसांत युद्ध पातळीवर काम करण्याचे आश्वासन देण्यात आले. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास अजून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे यांनी दिला.

भाजपा कार्यालय पासून या मोर्चा ला सुरवात झाली. या प्रसंगी शहर अध्यक्ष सुयोग बाळबुधे, माजी अध्यक्ष अरविंद नंदूरकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव प्रकाश बगमारे, जिल्हा सचिव साकेत भानारकर,माजी नगरसेवक मनोज वठे, माजी नगरसेवक मनोज भूपाल,विलास विखार युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ,तनय देशकर, स्वप्नील अलगदेवे, दत्ता येरावार,अमित रोकडे,पवन जयस्वाल,अशोक सालोटकर,प्रा.संजय लांबे, राजू भागवत,जुंबडे सर,नितीन आंबोरकर,बंटी येरावार,दिलीप पंडित,डॉ. सुमित जयस्वाल आणि ब्रम्हपुरी येथील जनता उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये