डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

चांदा ब्लास्ट
घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने रविवार, ६ जुलै रोजी भारताच्या एकात्मतेसाठी सर्वस्व अर्पण करणारे महान विचारवंत व राष्ट्रीय नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
“एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेंगे” असा स्पष्ट आणि ठाम नारा देणाऱ्या डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेला भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्यासह अमोल थेरे, गणेश कुटेमाटे, हेमंत कुमार, गणेश राजूरकर, निखिल आत्राम, सुनंदा लिहीतकर, संदीप तेलंग, हनुमान खडसे, स्वाती गंगाधरे, भारती परते, मयुरी धुर्वे, जाई आत्राम, प्रिया नागभीडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. मुखर्जी यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांची आठवण करून देण्यात आली आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.