ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दत्त मंदिर गडचांदूर येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

दत्त मंदिर गडचांदूर येथे गुरुपौर्णिमा व आषाढ़ी उत्सव साजरा करण्यात आला 2008 पासून सुरुवात झालेला उत्सव दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सोमवार दिनांक 3 जुलै ला उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला गुरु शिवाय ज्ञान नाही. ज्ञान शिवाय आत्मा नाही. ध्यान, ज्ञान, संयम आणि कर्म ही सर्व गुरुची देणगी या निमित्ताने श्री गुरुपौर्णिमा साईराम उत्सव समिती श्री दत्त मंदिर मंडळ गडचांदूर यांच्या मार्फत श्री साईं मंदिर श्री दत्त मंदिर येथे श्री साईंराम श्री दत्तगुरु चे अभिषेक करून नित्य नियमाने पूजा अर्चना करून सायंकाळी भजन कीर्तन ठेऊन श्री दत्त मंदिर परिसरात सायंकाळी 5 वाजता महाप्रसाद वितरित करण्यात आला. उपस्थित सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादचा लाभ घेतला. गुरुपौर्णिमा उत्सव चे आयोजन करण्यासाठी नगरसेवक सागर भाऊ ठाकुरवार,उपाध्यक्ष,शरद जोगी,महादेव एकरे,रमेश काकडे,विनोद तराळे,गणेश सातपाडे, गौरव बंडीवार,किटू जयस्वाल, नण्या पाचभाई,गणेश चापले, शँकर क्षीरसागर,आशीष शेरकी, निखिल ठेंगणे,प्रशांत पात्रे,आशितोष नागोसे,सुधीर पिंपळकर,सुनील झाडे,रुपेश चुदरी, रोहित शिंगाडे,रोहन काकडे,प्रफुल्ल उपाध्ये, कैलाश कुयटे, संजय पांडे,संदीप धनविजय,विठ्ठल दाखरे,अनिल पिंपळकर,दशरथमारलुन,राजकुमार रोहने,शिवा साळवे,शिवाजी साबळे, विकी घोरे,अनिल ठाणेकर,दीपक वरभे, संतोष बुतले,सर्व श्री गुरुपौर्णिमा साईंराम उत्सव समिती दत्त मंदिर गडचांदूर चे सदस्य आवर्जून उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये