आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, वर्धा चे वतीने सायबर जनजागृतींतर्गत सायबर गुन्ह्याबाबत विद्यार्थांना मार्गदर्शन

केसरीमल कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा येथे राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०३.०७.२०२३ रोजी केसरीमल कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा येथे राबविण्यात येत असलेल्या राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, वर्धा यांचे तर्फे सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबीरामध्ये सायबर शाखेतील श्री. दिनेश बोथकर व श्रीमती स्मिता महाजन यांनी फेसबूक, व्हॉट्सअप व इतर सोशल मिडीयाचे गैरवापर रोखण्याकरीता व सायबर जगात स्वत:ला सुरक्षीत ठेवण्याच्या उपायांची माहिती दिली तसेच ऑनलाईन बँकींग व्यवहारातील फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करुन इतर लोकांना सुध्दा सतर्क करण्याबाबत सांगण्यात आले. गुन्हा होण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध व जनजागृती हाच नुकसानापासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय असल्याचे सांगण्यात आले.

सदर कार्यक्रमास वर्धा विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार डॉ. पंकज भोयर, श्रीमती जयश्री कोटगीरवार प्राचार्या केसरीमल कन्या शाळा, श्रीमती संध्या दुर्गे तसेच श्री. सुनिल मेसरे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा, श्रीमती सुनीता ढवळे सरपंच ग्राम पंचायत वरुड, श्रीमती माधुरी भोयर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, श्रीमती रेश्मा रघाटाटे केन्द्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर, श्री. अतुल चौधरी व ३०० विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये