ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोलांडी येथील आश्रमात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

ज्ञान गंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था व गोसेवा केंद्र कोलांडी/नंदप्पा त.जिवती येथे 03/07/2023रोज सोमवार ला गुरुपोर्णिमा उत्सव संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे 03वाजता सर्व बाल गोपाळ व साधकांच्या हस्ते माता चामुंडा देवी मंदिरात दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच कलश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्राणायाम,योगासन व सामुहिक ध्यान घेण्यात आले ध्यानाला मराठवाडा, नांदेड,तेलंगणा, आंध्रा तसेच वणी चंद्रपूर जिवती तालुक्यातील परिसरातील 200 ते 250 साधकांची उपस्थिती होती तसेच महा सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सत्संगाला
400 ते 500साधक व भाविकांची उपस्थिती होती आणि 100ते 125 मुलांच्या हस्ते आई वडिलांचे पूजन करण्यात आले व दरवर्षी प्रमाणे परिसरातील गरजू व गरीब अनाथ भक्तांना व विद्यार्थ्यांना वस्त्र दान व शालेय साहित्य श्री प्रशांत भाऊ गोखरे गडचांदूर यांच्या सहकार्यातून सामाजिक कार्य पार पडले , या सर्व कार्य क्रमासाठी स्वजागृती शिबिरात सहभागी झालेल्या बाल व तरुण वर्गाकडून व्यवस्था व देखरेख करण्यात आली कार्य क्रमासाठी आश्रमातील कार्य कारणी मंडळी श्री शंकरराव देवाळकर श्री.बळीभाऊ हेपट,श्री धर्मराज पार्धे,श्री.वसंता काळे,श्री मारोती बुटले,प्रवीण मानुसमारे व इतर कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
महा प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये