ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्याच्या मागणीसाठी ब्रम्हपुरीकरांचा एल्गार

ब्रम्हपुरी १०० टक्के कडकडीत बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुड्डेवार

अनेक वर्षा पासून ब्रम्हपुरी जिल्हा झाला पाहिजे म्हणून मागणी होत आहे परंतु ब्रम्हपुरीतील जनतेची सरकार दिशाभूल करीत आहे या करीता ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूरला न देता ते ब्रम्हपुरी ला द्यावे यासाठी ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने ब्रम्हपुरी कडकडीने बंद व धरणे आंदोलनचे आव्हान करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन सकाळी ब्रम्हपुरी शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. ब्रम्हपुरी दवाखाने व मेडिकल दुकाने अपवाद वगळता जवळपास शंभर टक्के बंद होती.
.समितीच्या कार्यकर्त्यांनी शाळा, कॉलेज, मार्केट मध्ये जाऊन व्यवस्थापन बंद करण्याची आग्रहाची विनंती केली.
…याला ब्रम्हपुरीतील शाळा , काॅलेज , ठोक व चिल्लर व्यापारी यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.
दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.यात अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य डाॅ. कोकोडे होते तर या प्रसंगी ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी ब्रम्हपुरी जिल्हा झाला पाहिजे याकरिता शासकीय स्तरावर प्रयत्न करण्यावर भर दिला.अँड.गोविंदराव भेंडारकर यांनी या लढ्यात न्यायालयीन लढाईचे महत्व सांगितले.
….या प्रसंगी प्रा देविदासजी जगनाडे , मा नानाजी तुपट , मा अशोकजी रामटेके उपाध्यक्ष न प ब्रम्हपुरी,‌ मा संतोषजी रामटेके आर पी आय विदर्भ उपाध्यक्ष, डाॅ प्रेमलाल मेश्राम,
सौ सुधाताई राऊत , प्रा मंजूषा बजाज , प्रा राजकुमार शेंडे, डाॅ राखडे ,मा इक्बालभाई जेसानी अध्यक्ष व्यापारी संघटना, बांधकाम सभापती विलासजी विखार , मा अविनाशजी राऊत , मा प्रशांतजी डांगे अँड.आशिषजी गोंडाने या मान्यवरांनी ब्रम्हपुरी जिल्हा संबंधाने आपापले विचार व्यक्त केले.सर्वांच्या मनोगतानंतर समितीचे पदाधिकारी व उपस्थित विविध पक्षांचे मुख्य, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी यांनी ब्रम्हपुरी जिल्हा झाला पाहिजे व चिमूरला मंजूर करण्यात आलेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय रद्द करण्याबाबत मान उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना समितीचे निमंत्रक मा विनोदजी झोडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा राजूजी भागवत यांनी केले तर आभार प्रदर्शन मा सुनीलजी विखार यांनी केले .
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर ब्रम्हपुरीकर व
ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती चे पदाधिकारी व कार्यकर्ते ,महिला तसेच युवक मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये