ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी अभाविप आक्रमक – थेट समाजकल्याण आयुक्तांच्या कार्यालयात केले ठिय्या आंदोलन

सहाय्यक आयुक्त घेणार मागण्यांसंदर्भात बैठक

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

विद्यार्थ्यांच्या न्यायोचित मागण्या सोडविण्यात नेहमीच अग्रेसर असणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असुन ह्या संघटनेने आतापर्यंत विविध ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून विद्यार्थ्यांना शासनदरबारी न्याय मिळवून दिला आहे. आपल्या ह्याच कर्तव्याला स्मरून अभविपच्या चंद्रपूर महानगर शाखेने मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्याच्या समस्या सोडविण्यासाठी 3 जुन रोजी चंद्रपूर समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चंद्रपूर येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून ह्याबाबतीत वारंवार तक्रारी करूनही विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली निघाले नाही. अखेरीस ही बाब अभाविप कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी थेट सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली. अखेरीस समाज कल्याण चे अधिक्षक पदावर कार्यरत अधिकारी माकोडे ह्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन अग्रेशित केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदनात अनेक मुद्दे उपस्थित केले असुन 1) वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे देण्यात येणारे तब्बल दोन वर्षांपासून पुरविण्यात आले नसल्याने ह्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक साहित्य अविलंब देण्याची मागणी केली.

2) विद्यार्थ्यांना देय असलेला निर्वाह भत्ता 6 महिन्याच्या अंतराने मिळत असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात अडचणी येत आहेत ह्या अडचणींचा विचार करून त्यांना मिळणारा मासिक निर्वाह भत्ता दरमहा देण्यात यावा.

3) विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम मिळावा म्हणून नियमाप्रमाणे देण्यात येणारे खेळाचे साहित्य तत्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे.

4) व्यायामशाळेत (जिम) व्यायामाचे साहीत्य उपलब्ध करुन प्रशिक्षकांची सुविधेसह व्यायामशाळा तत्काळ सुरू करावी.

5) विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम असावे ह्यासाठी शासनाने भोजन, दूध, फळे अंडी इत्यादी जिन्नस देताना काही निकष घालुन दिले असुन चंद्रपूर येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात बरेचदा निकृष्ट जेवण पुरविण्यात येते. येथिल जेवणात अळ्या आढळून आल्याचे निदर्शनास आले असुन विद्यार्थ्यांना खराब झालेले फळे देण्यात येत असल्याच्या बऱ्याच तक्रारी वारंवार करण्यात आल्या असूनही त्यावर योग्य ती कारवाई झालेली नाही त्यामुळे संबंधित वसतिगृहातील भोजन कंत्राटदार बदलून नविन व योग्य व्यक्तीस कंत्राट देण्यात यावे.

6) वसतिगृहातील ग्रंथालयात एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन आवृत्तीचे पुस्तके उपलब्ध करुन द्यावी.

7) विद्यार्थ्यांना शासनाकडुन देय असणाऱ्या विविध शिष्यवृत्या वेळेत मिळाव्यात यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.

8) वसतिगृहातील स्वच्छतेसंदर्भात संबंधित कंत्राटदार/कंपनीला समाधानकारक काम करण्याचे निर्देश द्यावेत.

9) समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर च्या सहाय्यक आयुक्त व वसतिगृहाच्या निरिक्षक/वार्डन पदावर नियमित नियुक्ती असावी.

10) वसतिगृहात अनेकदा शॉर्ट सर्कीट झाले असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्यात येऊ नये यास्तव वीज पुरवठा, वायरिंग व अन्य कामे त्वरीत करण्याचे निर्देश द्यावेत. अशा मागण्या निवेदनामार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आल्या आहेत. ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख ह्यांनी अखेरीस अभाविप कार्यकर्त्यांशी दूरध्वनी वरून चर्चा केली असून दिनांक 04 जुलै, 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी अभाविप प्रदेश मंत्री शक्ती केराम, अमोल मदने, पियुष बनकर, शैलेश दिंडेवार, तन्मय बनकर, आदर्श मास्टे, कुश दवे, हर्ष भांदककर, रितीक कनोजिया, अमित पटले, वैदेही मुडपल्लीवार, रोहीत खेडेकर यांच्यासह वसतिगृहात राहणारे विद्यार्थी अनिकेत पुणेकर, मयुर बुरेवार, श्रेयश उराडे, शुभम भोयर, शुभम मिसलवार, स्वप्निल कांबडे, गजानन कोंडागोर्ला, प्रशांत पोशट्टीवार, उमेश पट्टेवाले, तेजस भगत, तारेश डांगे, प्रविण गायकवाड, प्रशिक शेंडे, रितीक मेकाले, प्रज्वल ताकसांडे, चेतन नारनवरे, हिमांशु अमृतकर, पवन गायकवाड, कुलदीप रामटेके यांच्यासह अन्य विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये