ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्री संत नरहरी महाराज संस्थान देऊळगाव राजा येथे आषाढी एकादशी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीसंत नरहरीनाथमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथेआज दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशीचे पर्वकाळानिमित्त नायब तहसीलदार सायली जाधवजी व नायब तहसीलदार श्री.सदानंद नाईक या उभयतांचे हस्ते सकाळी सहा वाजता प्रशासकीय महापूजा संपन्न झाली.
मागील चार वर्षांपासून प्रतिवर्षी आषाढी एकादशीचे दिवशी मा.तहसीलदार देऊळगावराजा यांच्या शुभहस्ते या महापूजेचे आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी संस्थानचे प्रमुख, वारकरी विद्यालय चे विद्यार्थी,शिक्षक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पुरुष महिला मोठया संख्येने सहभागी झाले होते.