माणिककुटी भवन परिसरात वृक्षारोपण संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्यावतीने देवाडा चंद्रपूर येथील महाकाली नगरी माणिक कुटी भवन परिसरात मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय सेनेचे माजी सैनिक तथा समाजसेवी मनोज ठेंगणे, आय.टी. आय.चे सेवानिवृत्त गटनिदेशक नामदेव गेडकर, झाडीपट्टीतील लेखक डॉ. प्रा. धनराज खानोरकर, प्रा. नामदेव मोरे, डॉ. धर्मा गावंडे, सौ. रजनी बोढेकर, बंडू टेकाम गुरुजी, झाडी नाटकातील सुप्रसिद्ध कलावंत महेंद्र भिमटे, बाल कार्यकर्ते चि. गौरव पिपरे, रेयांश घोडेस्वार उपस्थित होते.
सुरूवातीला स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. खानोरकर होते. प्रास्ताविक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत रजनी बोढेकर यांनी केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. खानोरकर म्हणाले, वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे असून झाड हेच खऱ्या अर्थाने आपला श्वास आहे. त्यामुळे त्याचे संगोपन करणे हे आपले कर्तव्य ठरते. लावलेल्या झाडांचा दरवर्षी वाढदिवस साजरा केला पाहिजे.
जेणेकरून झाडांप्रती आपुलकीची भावना निर्माण होईल. यावेळी त्यांनी राष्ट्रसंतांच्या व तुकाराम महाराज यांनी वृक्षावर आधारित ओव्या गाऊन वृक्षाचे महत्त्व प्रतिपादन केले.तसेच त्यांनी स्वरचित पावसाळी कविता सादर केली. उपस्थित अतिथींनी समायोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नामदेव मोरे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. धर्मा गावंडे यांनी केले.