काँग्रेस पक्षाचे नेते विजयराव बावणे यांना अखेर शेखर धोटे यांनी जाहीर केला खुला पाठिंबा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असताना.अखेर शेखर धोटे यांनी आपला खूला पाठींबा विजयराव बावणे यांना दि.6/7/2025ला जाहीर केला कोरपना-जिवती ‘अ’ गटातून काँग्रेसचेच दोन उमेदवार रिंगणात होते. चांगलाच राजकीय पेच निर्माण होईल.असे माजी आमदार सुभाष भाऊ धोटे यांना वाटू लागला तेव्हा त्यांनी आपले बंधू ला माघार घेण्यास सांगितले व खुला पाठींबा जाहीर केला.
विजयराव बावणे कोरपना तालुक्यात काँग्रेसचे मातंबर नेते म्हणून ओळख आहे. काँग्रेसचे निष्ठावान सक्रिय राजकारणात आहे. आणि विद्यमान संचालक विजय बावणे (कोरपना) यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे,कार्यकर्त्या मध्ये जोश वाढलाअसून सर्व कार्यकर्त्याचे त्यांनी अभिनंदन केले.
विजय बावणे यांच्या उमेदवारीला स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रचंड पाठिंबा होता. कार्यकर्त्यांच्या जमेच्या बळावरच त्यांची उमेदवारी पक्की होती.
विजयराव बावणे यांचा स्थानिक पातळीवर चांगला जनसंपर्क आहे, त्यांचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.