देऊळगाव राजाच्या अक्षय अक्करबोटेने प्रतिकूल परिस्थितीत केली सीए परिक्षा उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथील अक्षय सत्यकुमार अक्करबोटे या युवकाने प्रतिकूल परिस्थितीत सीए परिक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यामूळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अक्षय च्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असताना सुद्धा नोकरी करून ही परिक्षा उत्तीर्ण केली आहे हे विशेष आहे.
अक्षय ने 12 वी परिक्षा जालना येथील जे ई एस कॉलेज मधून पास करून बी कॉम देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर येथून केल्यानंतर पुणे येथील आय सी आय मधून सी ए परीक्षा उत्तीर्ण केली आहे,2021 पासून पुणे येथील एका सी ए कंपनीत काम करून अभ्यास करत ही परिक्षा उत्तीर्ण केली आहे.
अक्षय आपल्या यशाचे श्रेय आई वडिल व संपुर्ण परिवाराला देत आहे.
देऊळगाव राजा येथे ठीक ठिकाणी अक्षय आणि त्याचे आई वडिल यांचा सत्कार करून त्याला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या,