देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करून चोरटी विक्री
पो-रेड करून एकुण १ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मोहरम व आषाढी एकादशी निमीत्ताने आज दिनांक 06/07/2025 रोजी पुलगांव पोलीसांनी अवैद्यरित्या वाहतुक व चोरटी विक्री करणा-या आरोपी नामे 1) रामेश्वर गजानन परिसे वय 18 वर्ष राहणार नाग मंदिर जवळ विटाळा धामणगाव मंगरूळ दस्तगीर जिला अमरावती 2)विजय सखारामजी शिंदे वय 48 वर्ष राहणार मलकापूर बोधड 3) विजय यादराम श्रीवास्तव वय 43 वर्ष राहणार चिटकी कवठा झोपडी पुलगाव 4) संजय मून वय 43 वर्षे राहणार कवठा रेल्वे पुलगाव यांच्यावर दारुबंदी मोहीम राबविली असता 1) वर्धा-टी पॉइन्ट वर नाकाबंदी करून प्रो-रेड केला असता आरोपीच्या ताब्यातील विना नंबर प्लेट असलेली मोपेड़ गाडी नाकाबंदी दरम्यान थांबुन चेक केली असता मोपेड़ गाडी चे पायदानवर दोन खर्डाचे खोक्यात देशी दारूने भरलेल्या 180 एम एल च्या एकुण 96 निपा प्रति नग 100 रु प्रमाणे 9600/रु व विना नंबर प्लेट असलेली मोपेड़ गाडी किंमत 1,00,000/रु 2) कवठा रेल्वे येथे प्रो-रेड केला असता आरोपीचे ताब्यातून देशी दारूने भरलेल्या 180 एम एल च्या एकुण 48 निपा किं 4800/रु 3) चिटकी कवठा झोपड़ी येथील आरोपीचे ताब्यातुन देशी दारूने भरलेल्या 180 एम एल च्या एकुण 48 निपा किं 4800/रु 4) मलकापूर बोदड येथील आरोपीवर प्रो-रेड केला असता आरोपीचे ताब्यातुन एका प्लास्टीक कॅन मध्ये 35 लिटर गावठी मोहा दारू कॅनसह किंमत 3800/रु असा वेगवेगळ्या ठिकाणा पो-रेड करून एकुण 1,23,000/रु चा माल पंचा समक्ष जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगांव राहुल चव्हान सा.श्री यशवंत सोळसे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगांव यांचे मार्गदर्शनात डीबी पथक मधील प्रमुख पोलीस उप-निरीक्षक घनश्याम जाधव, डीबी पथकातील पोहवा रितेश गुजर, नापोशी अनुप खेडकर, पोशी विश्वजीत वानखेडे, गणेश इंगळे, सत्यप्रकाश काकण यांनी केली आहे