अवैद्यरित्या वाहतुक करणाऱ्यावर नाकाबंदी करून प्रो_रेड
एकूण ६ लाख २१ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 05/07/2025 रोजी पुलगांव पोलीसांनी अवैद्यरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपी नामे दिनेश नारायणदास माटा वय 39 वर्ष राहणार सिंधी कॉलनी पुलगाव याच्यावर डायमंड लॉज येथील मेन रोड वर नाकाबंदी करून प्रो-रेड केला असता चार चाकी इकोस्पोर्ट गाडी मध्ये दोन पेटी देशी दारू ने भरलेल्या 180 एम एल च्या 96 निपा एक पेटी विदेशी दारू ने भरलेल्या 180 एम एल चा निपा व चार चाकी वाहन क्रमांक MH-44-M-413 गाडी किंमत 6,21,600/रु चा माल पंचा समक्ष जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगांव राहुल चव्हान सा.श्री यशवंत सोळसे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगांव यांचे मार्गदर्शनात डीबी पथक मधील प्रमुख पोलीस उप-निरीक्षक घनश्याम जाधव, डीबी पथकातील पोहवा रितेश गुजर, नापोशी अनुप खेडकर, पोशी विश्वजीत वानखेडे, गणेश इंगळे, सत्यप्रकाश काकण यांनी केली आहे