पोलीस स्टेशन आर्वी येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाची विदेशी दारु वाहतुकबाबत कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन आर्वी जिल्हा वर्धा येथील गुन्हे प्रगटीकरण पथकास दिनांक 03/07/2025 रोजी गुम बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरुन वर्धा टि पॉईट आर्वी जवळ पंच व पो. स्टॉफच्या मदतीने विदेशी दारु वाहतुकीबाबत नाकेबंदी केली असता, नाकेबंदी दरम्यान खबरेप्रमाने एक इसम वेगाने त्याचे ताब्यातील सुझुकी कंपनीटी सिल्वर रंगाची अल्टो क्र. एम.एच.32/ए,एच/1252 नी तळेगाव शा.प. कडुन’ आर्वी शहराकडे येत दिसल्याने त्यास थांबवुन पंचाचा व पो. स्टॉफचा परीचय देवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव रविंद्र नरेश मसराम वय 28 वर्ष रा. बुरड मोहल्ला, वर्धा ता.जि. वर्धा असे सांगितले, त्यास आमचा उद्देश सांगुन त्याचे गाडीची पंचासमक्ष पाहणी केली असता, अल्टो गाडीचे मागील सीटवर ।) तीन खरड्याच्या खोक्यात 180 एम.एल. काचेच्या 130 सिलबंद निपा, प्रती निप 350/- रु. प्रमाणे 45,500/- रु.2) गाडीचे डिक्कीत दोन खरड्याच्या खोक्यात ऑफीसर चॉईस प्लेन कंपनीच्या 180 एम.एल. प्लास्टीकच्या 96 सिलबंद निपा, प्रती निप 250/- रु. प्रमाणे 24,000/- रु. 3) एका खरड्याच्या खोक्यात ऑफीसर ब्लु कंपनीच्या 180 एम.एल. काचेच्या 48 सिलबंद निपा, प्रती निप 300/- रु. प्रमाणे 14,400/-रु.4) एक सुझुकी कंपनीची सिल्वर रंगाची अल्टो कार क्र. एम. एच./32/ए, एच/1252 किमंत 4,00,000/-रु. असा जुमला किमंत 4,83,900/- रुपयाचा विदेशी दारुचा माल मिळुन आल्याने मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करुन जप्त करण्यात आल असुन नमुद आरोपीवरविरुध्द पोलीस स्टेशन आर्वी येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये व मोटार वाहन कायद्यान्वयेगुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन साहेब, प्रभारी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल चव्हाण साहेब, यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन आर्वी ठाणेदार मा. पो.नि. सतिश डेहणकर साहेब, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी पो.उप.नि. संतोष चव्हाण, पोहवा, योगेश चन्ने, पोना, अंकुश निचत, पोना, प्रविन सदावर्ते, पो. अं. सुरज रिठे, सागर पाचोळे, भुषण ईखार, संजय बोकडे यांनी केली., सदर गुन्हयाचातपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात सुरु आहे.