ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक  डोईफोडे

 येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार दि. ५ ला स्पर्धा परीक्षा प्रणालीची ओळख या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन पार पडले.

   या कार्यक्रमात आय कॅन अकॅडमी, वणीचे संचालक तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सोपान लाड यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची माहिती देत त्या कशा प्रकारे द्यायच्या, त्यासाठीची अभ्यास पद्धती, वेळ व्यवस्थापन व यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. आशिष देरकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरित करत आत्मविश्वास कसा वाढवावा यावर व प्राचार्य माहुरे यांनी मार्गदर्शन केले.

          कार्यक्रमाचे आयोजन प्रा. विवेक पाल व प्रा. बाळू उमरे यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

      अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून भविष्यात स्पर्धा परीक्षांत उत्तम यश मिळवता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये