ज्येष्ठ नागरिकांचे विनामूल्य शारीरिक तपासणी शिबिर
६० ज्येष्ठ नागरिकांची केली तपासणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय पालक मित्र मंडळ भद्रावती व अ.भा. ग्राहक मंच भद्रावती यांचे वतीने ‘फिट अँड फाईन क्लब चंद्रपूरच्या संचालिका पूनम प्रेम मस्के यांचे सौजन्याने शुक्रवार दि.४ जुलैला सकाळी १० वाजता स्थानिय जेष्ठ नागरिक भवन येथे विनामूल्य शारिरीक तपासणी शिबिर घेण्यांत आले. या शिबिरात ६० जेष्ठ नागरिकांची शारिरीक तपासणी करण्यांत आली.
कार्यक्रमाचे व मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते यांनी मंडळाच्या ७ वर्षाच्या वाटचालीची माहिती दिली. तर पुनम म्हस्के यांनी शारिरीक तपासणीचे महत्व पटवून दिले.
जेष्ठ नागरिक मंडळाचे सचिव काशिनाथ मनगटे यांनी सभागृह उपलब्ध करून दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे कोषाध्यक्ष चंपत आस्वले, सहसचिव आ.रा.कुटेमाटे, बाळा कुटेमाटे, बंडू मांडवकर,उपाध्यक्ष भिवगडे, गुंडावार व इतरांचेही सहकार्य लाभले.
अ.भा.ग्राहक मंचाचे वसंत वऱ्हाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर मंडळाचे सचिव माधव कौरासे यांनी सर्व जेष्ठांचे व सहकार्य करणाऱ्या चमूचे आभार मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.