आ. सुधीर मुनगंटीवार यांचा मुल बस आगारासाठी पुढाकार
आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मिळणार यश परिवहन मंत्र्यांनी दिले बैठक घेण्याचे निर्देश

चांदा ब्लास्ट
मुंबई : बल्लारपूर विधानसभेतील मुल शहरात बस आगार मंजूर आहे. मुल नगरपरिषदकडून जागा देखील आरक्षित करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर जागेची पाहणी देखील झालेली आहे. परंतू, शासन स्तरावर पुढील कार्यवाई अद्याप प्रलंबित आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीला राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. मुल शहरातील बस आगारासाठी परिवहन मंत्र्यांनी सोमवार ७ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीत बस आगारासाठी जागा निश्चितीसाठी शिक्कामोर्तब, निर्णयाची अंमलबजावणी, संबंधित विभागांमधील समन्वय आणि संभाव्य अडचणी यावर परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. बैठकीसाठी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बैठकीला महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे (एमएसआरटीसी) व्यवस्थापकीय संचालक, मुंबईचे संबंधित अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मुल तालुक्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून रखडलेल्या आगाराच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल तालुक्याच्या विकासासाठी असंख्य कामे केली असून, त्यांच्या प्रयत्नातून मुल तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. बल्लारपूर विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नरत आहेत, हे विशेष.