ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाटण केंद्रातील शिक्षकांना नियमबाह्य टेकामांडवा केंद्रात प्रतिनियुक्ती

पंचायत समिती जिवतीचा भोंगळ कारभार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शासन नियमानुसार एखाद्या शिक्षकाला प्रतिनियुक्ती द्यायची असेल तर ती त्याच्या केंद्रात प्राधान्याने देता येते. केंद्रात जागा नसेल तर नजीकच्या केंद्रात देता येते परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेरी येथे कार्यरत असलेले शिक्षक दामोदर घुले यांना टेका मांडवा केंद्रातील पालडोह या शाळेमध्ये प्रतिनियुक्तीचा आदेश देण्यात आलेला आहे.

हा आदेश पूर्णपणे चुकीचा असून शासन निर्णयाच्या विरुद्ध आहे. शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असलेले दामोदर घुले हे एकमेव शिक्षक असून ज्यांना पाटण केंद्र बाहेर प्रति नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्यांच्या याप्रतिनियुक्तीला कर्मचारी संघटनेचा देखील विरोध आहे.

यापुढे जर असेच पद्धतीने प्रतिनियुक्ती दिली तर आंदोलन छेडण्याचा इशारा पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने दिलेला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये