अजबच… देखाव्यासाठी ठेवलेल्या बगळ्या पक्षाच्या पुतळ्याचे विद्रूपीकरण
मुंडके तोडून चोचित लटकविले : नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील मुख्यमार्गावरील द्विभाजकावरील पक्षाचे पुतळे देखाव्यासाठी नगर पालीका मार्फत उभारण्यात आले .मात्र काही मृर्ख व्यक्तींनी त्या पुतळ्याची मुंडके तोडून त्याची चोच मूणक्यात उलटे लटकवून विद्रोपिकरण केल्याचा प्रकार नागमंदर परिसरात घडला आहे . या देखाव्याकडे सुज्ञ नागरिकासह न. प.चे खरेच लक्षण नाही का याकडे प्रत्यक्षरीत्या लोकमतने लक्ष वेधले आहे.
ऐतिहासिक नगरी भद्रावती ही पर्यटन नगरी आहे त्यातच ताडोबा अभयारण्य तालुक्या ला लागून असल्याने तालुक्यात वन्य प्राण्या सह इतर पक्षाचे मोठ्या प्रमाणात वास्तव आहे या प्राण्याबाबत नागरिकांना महत्त्व कढावे तसेच भद्रावती नगरीचे आकर्षण वाढावे याकरता सत्ताधाऱ्यांनी लाखो रुपयांचा निधी खर्च करून वन्य प्राणी, पाळीव प्राणी, तसेच पक्षाचे पुतळे बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून नागमंदीर परिसरापर्यंत व्हिभाजकावर लावण्यात आले सध्या न.प. पक्षा चे सत्ताधारी नसून दिनांक ५ ऑक्टोंबर २०२३ पासून प्रशासक म्हणून नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांच्याकड कारभारे आला आहे प्रशासकाच्या या दोन वर्षाच्या काळात विविध चर्चा नी नगरपालिका गाजत आहे.
त्यातच आणखी एक भर पडली आहे भद्रावतीच्या गजबजलेल्या ठिकाणी नाग मंदिर परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून येथील बगडा पक्षाच्या पुतळ्याचे मुंडके कापून चक्क चोच मुणक्यात लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे या भागात काही सुज्ञ नागरिक सुद्धा राहतात त्यतचं न.प . कर्मचारी दररोज या परिसरात स्वच्छता करतात तसेच येथे लागून असलेल्या हुतात्मा स्मारक परिसरात न.प. पधिकार्यासह न . प . कर्मचारी सुद्धा येत असतात मात्र खरेच यांचे पक्षाच्या पुतळ्याच्या विद्रुपकरणाकडे लक्ष नाही का असा प्रश्न पडला आहे.
तेथेच या रस्त्यांनी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी ही बाब न. प. कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली मात्र त्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर लोकमतने पक्षाच्या विद्रोपीकरणाबाबत वृत्ताकणाच्या माध्यमातून न. प. प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.