ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

63 दारूबंदी गुन्ह्यातील देशी-विदेशी दारुसाठा पाथरी पोलिसांनी केला नष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली :- दारूबंदी गुन्ह्यातील एकूण 2,44,555/रूपयाचा अवैध दारू साठा पोलीस स्टेशन पाथरी कडून बुधवार रोजी नष्ट करण्यात आला.

 पोलीस स्टेशन पाथरी येथील 63 दारूबंदी गुन्ह्यातील 2,09,885/रू. किमतीची देशी दारू व 34670/रू. किमतीची विदेशी दारू असा एकूण 2,44,555/रुपयाचा मुद्देमाल न्यायालयाच्या व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशाने बुधवार रोजी दुय्यम निरीक्षक सागर धिडसे राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांच्या समक्ष सदरच्या दारू साठा नष्ट करण्यात आला यावेळी पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितेश डोर्लीकर, यशवंत कोसनशीले, वसंता कुंभरे, अमित मस्के, सुरेश शेंडे, बळीराम बारेकर, खेलैश कोरे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये